पुणे: राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाच्या वतीने सर्वपित्री अमावस्येनिमित्त बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करुन आज संगम घाटावर विसर्जन करण्यात आले.
बेवारस मृतदेह तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ससूनच्या शवागारात ठेवता येत नाहीत, त्यानंतर कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांचे दहन केले जाते. अस्थींचे एक महिना जतन केले जाते. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मृतदेह ताब्यात मिळाला नाही, तरी किमान अस्थी मिळण्याची सोय होते. ओळख न पटलेल्या मृतदेहांच्या अस्थींचे दर महिन्याच्या अमावस्येला विसर्जन केले जाते. गेली तीन वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु आहे.
मंदार रांजेकर, विजय बढे, मुकेश खामकर, नीलेश राखुंडे, पराग कानिटकर, सदाशिव कुंदेल, अक्षय माने यांनी संयोजन केले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी दत्तात्रय महाडीक, धर्मेंद्र लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन
Date: