बेळगाव-केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर बेळगावी करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कर्नाटक राज्योत्सवदिनी म्हणजेच (ता. १ नोव्हेंबर) काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील होते.
सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत पुराव्यांना बाधा पोहचेल, असे निर्णय कर्नाटक सरकारला घेता येऊ नयेत म्हणून दिल्लीतील वकिलांशी समितीच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. नामांतराचा निषेध म्हणून सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी होऊन अस्मितेचे दर्शन घडविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी बैठकी नंतर दिली.
बेळगावी प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी मराठी भाषिकांचा मोर्चा
Date: