पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित आज त्यांच्या बिशप हाउसमध्ये त्यांना शुभेछा देण्यासाठी गर्दी केली होती . सेंट पेट्रीक्स चर्चच्या आवारातील बिशप हाउसमध्ये त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी
पुणे धर्मप्रांताचे विकार जनरल फादर माल्कम सिक़्वेरा , नितीन डिसोझा ,विद्याभवन शाळा आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक रेव्हरंड फादर गोडविन सलढाणा ,शीतल डिसोझा, फादर व्ही. लुइस , सिस्टर्स , तसेच विद्या भवन शाळेमधील विद्यार्थी , शिक्षक वर्ग आणि ख्रिस्त बांधव उपस्थित होते .
यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित पुणे धर्मप्रांताच्या अंतर्गत असलेल्या २८ शाळा आणि २ महाविद्यालयामधून विद्यार्थीकडून काश्मीर मधील पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत निधी गोळा करण्यात आला . हा जमा झालेला आर्थिक निधी काश्मीर मधील कारीतारा इंडिया या सामाजिक संस्थेकडे देण्यात येणार आहे . त्या संस्थेच्या माध्यमातून काश्मीर मधील पूरग्रस्ताना मदत देण्यात आहे , अशी माहिती पुणे धर्मप्रांताचे विकार जनरल फादर माल्कम सिक़्वेरा यांनी दिली .
यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांनी आपले वाढदिवसानिमित आणि दीपावलीनिमित शुभेछा देताना सांगितले कि , दिवाळीचा सण , सत्याचा प्रकाश देऊन येत असतो , सत्याची प्रेरणा , हे दिवाळीचे प्रमुख उद्दिष्ट . प्रकाश हे सत्याचे प्रतिक आहेत , आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्याला प्रथम स्थान देतो , हाच दिवाळीचा संदेश आहे . विषमता , स्त्रियांवरील अत्याचार , मुलांचे कुपोषण आणि मुलांच्या जडण घडणीकडे दुर्लक्ष , समाजातील भीषण गरिबी आणि भ्रष्टाचार एकूण नैतिकतीचे अधिपतन हे सारे सत्याशी आणि दिवाळीची मूळ प्रेरणेशी विसंगत आहे आणि आपण निपटून काढण्यासाठी पुढे येऊ या . प्रभू येशु ख्रिस्ताची प्रेरणा हि सगळ्यांना मदत करण्याची आहे , त्यासाठी पुणे धर्मप्रांताच्या अंतर्गत असलेल्या २८ शाळा आणि २ महाविद्यालयामधून विद्यार्थीकडून काश्मीर मधील पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत निधी गोळा करण्यात आला . हि मदत करताना समाजासाठी असणारी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचे ऋण आपण फेडत आहोत .यावेळी पुणे धर्मप्रांताचे विकार जनरल फादर माल्कम सिक़्वेरा यांनी पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांना दीर्घायुष्य लाभो , यासाठी प्राथर्ना केली .