पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थात बालदिनानिमित पुणे कॅम्प भागातील एम. एस. व्ही. फाउडेशनच्यावतीने पदपथावरील अनाथ मुलांसमवेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी कॅम्प भागातील सेंट मेरी चर्चच्या चौकातील अनाथ मुलांना आंघोळ घालून त्यांना नवीन कपडे आणि उबदार स्वेटर घालून त्यांना गोड खाऊ देऊन मुलांसमवेत एम. एस. व्ही. फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी यांनी बालदिन साजरा केला , यावेळी त्यांना सुरुवातीला आंघोळ घातली , त्यानंतर नवीन कपडे दिलि. त्यांनतर थंडी पासून बचावासाठी नवीन जाड उबदार स्वेटर घालण्यात आले . त्यानंतर त्यांना गोड खाऊ आणि गुलाबाची फुले देण्यात आली .
यावेळी एम. एस. व्ही. फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी , मेजरसिंग कलेर , रिदिम्मा विरदी , भोलासिंग अरोरा , मनप्रित विरदी, सलमान शेख , सुरज अग्रवाल , राजू राठोड , भारत शेलार , रफिक शेख , सहेर विरदी , देशमुख चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी मनजितसिंग विरदी यांनी सांगितले कि , भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालदिनानिमित बाल स्वछता अभियान संपूर्ण देशात राबवीत आहे , त्यामुळे एम. एस. व्ही. फाउडेशनने देखील रस्त्यावरील , चौका – चौकातील बालकांसाठी बाल स्वछता अभियान राबविले . त्यासाठी पुणे कॅम्प भागातील या मुलांना डेटोलच्या पाण्याने चांगली आंघोळ घालून त्यांना स्वछ करण्यात आले . त्यांनतर त्यांना नवीन कपडे देण्यात आली , थंडीपासून बचावासाठी नवीन उबदार स्वेटर घालण्यात आले . त्यानंतर गुलाबपुष्प आणि गोड खाऊ देण्यात आला , यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता . खरोखरच बालदिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे त्यांनी सांगितले . तसेच विक्स वेपोरबची औषधे देखील देण्यात आली .