बारावीच्या परीक्षेत आबेदा इनामदार गर्ल्स कॉलेज चा निकाल 97 टक्के
पुणे :
महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एजुकेशन सोसायटीच्या ‘आबेदा इनामदार गर्ल्स ज्युनियर कॉलेज’ चा 12 वी परीक्षेचा निकाल 97 टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या 975 पैकी 952 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. शास्त्र शाखेत वैष्णवी गुप्ता, वाणिज्य शाखेत आलिया शेख, कला शाखेत जीक्रा शेख तर व्होकेशनल शाखेत अलीफिया तंडेवाला प्रथम आल्या.
संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार, उपाध्यक्ष अबेदा इनामदार, प्राचार्य आयेशा शेख, उप प्राचार्य गफार शेख यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज’चा 12 वी परिक्षेचा निकाल 86.57 टक्के लागला आहे.
शास्त्र शाखेत कामठे अनिकेत 94.76 टक्के, वाणिज्य शाखेत साखरे ऋतुपर्ण 83.84 टक्के आणि कला शाखेचा शेख अमिर हम्जा गानी 66 टक्के मिळवुन प्रथम आले. अशी माहिती ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज’चे प्राचार्य सिकंदर शेख यांनी दिली.
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.