पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल तब्बल 91.26 टक्के लागला असून, कोकणातील 95.68 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. राज्यात उत्तीर्ण मुलींचे प्रमाण 94.26 टक्के आहे तर मुलांचे प्रमाण 88.31 टक्के इतके आहे. कोल्हापूर विभागातील 96.27 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
विज्ञान शाखेतील 95.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर वाणिज्य विभागाचे 91.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील 86.31 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एमसीएसव्ही विभागाचे 89.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या निकालात नऊ विभागीय मंडळांपैकी, नाशिक वगळता आठ विभागांनी नव्वदी पार करण्याचा पराक्रम केलाय. नाशिक विभागातील 88.13 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोकण विभागाखालोखाल अमरावती विभागाचा नंबर लागलाय. अमरावतीचा निकाल 92.50 टक्के, तर कोल्हापूरचा 92.13 टक्के आणि नागपूरचा निकाल 92.11 टक्के आहे. विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात91.96टक्के, लातूर विभागात 91.93 टक्के आणि औरंगाबादमध्ये91.77 टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेतली आहे.
विभागवार निकाल
पुणे- 91.96 टक्के
मुंबई- 90.11 टक्के
नागपूर- 92.11 टक्के
औरंगाबाद- 91.77 टक्के
कोकण- 95.67 टक्के
नाशिक- 88.13 टक्के
अमरावती- 92.50 टक्के
कोल्हापूर- 92.13 टक्के
लातूर- 91.13 टक्के.