बारामतीकरांनो काका पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा
बारामती- येत्या १५ ऑक्टोबरला काका पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले , बारामतीच्या परिसरातील शेतकरी आजही काका-पुतण्याच्या गुलामगिरीत असून, त्यांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच आपण येथे आलो आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जोरदार फटकेबाजी केली. पवार काका-पुतण्यांनी सामान्यांची शेत, जमिन आणि स्वप्नं सगळं काही लुटले असल्याची जहरी टीकाही केली.
तुम्ही संरक्षणमंत्री असतानाही पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती सुरूच होत्या. मग शरदराव, तेव्हा तुम्ही सीमेवर गेला होतात का?, असा सडेतोड सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांसह सर्वच टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पवार काका-पुतण्याला लक्ष्य केलं.आम्हाला आमची जबाबदारी कळते. सीमेवर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. जवानांचं मनोबल खच्ची होईल असं बोलू नका, राजकीय व्यासपीठावर हे विषय आणू नका, असंही मोदींनी आपल्या विरोधकांना सुनावलं.
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू आहे आणि नरेंद्र मोदी दिवसाआड महाराष्ट्रात सभा घेताहेत, पंतप्रधान कार्यालय बंद पडलंय, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. त्यांचा आज मोदींनी समाचार घेतला.
ते म्हणाले ,15 ऑक्टोबरचा दिवस बारामतीच्या स्वातंत्र्याचा दिवस असेल,15 वर्षातील कुशासनाचा अंत करण्याची हि बारामतीकरांना संधीआहे ,
पाणी मागण्यासाठी आलेल्यांसाठी अजित पवारांनी कसे शब्द वापरले हे ठावूक आहे , अनेक गावांना आजही पिण्याचं पाणी मिळत नाही,अजूनही बारामतीतील 40 हून गावे पाण्यावाचून वंचित आहेत ,सरकारी अनुदानातील सहकारी साखर कारखाने तोट्यात अन् खासगी मालकीचे कारखाने नफ्यात कसे?मी गरीबी अनुभवली आहे, माझे सरकार अशाच सर्वसामान्यांसाठी आहे , ज्यांनी दहा वर्षात दहापटीने भ्रष्टाचार केला, त्यांना राजकारणात स्थान देऊ नका.शेतकऱ्यांची मतं मिळवली, पण आजवर कधी यांनी शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार केला नाहीअमेरिकेत भारताचा जयजयकार होतोय, ही सर्व सव्वाशे कोटी भारतीयांची करामत आहे , महाराष्ट्राचा सर्वत्र जयजयकार व्हावा, यासाठी भाजपला बहुमत द्या.असेही मोदी म्हणाले