गणेशोत्सवात जल्लोष आणि उत्साहात वाजवली जाणारीगणपतीचीगाणीहा अविभाज्य घटक असतो. दर वर्षी गणपतीची अधिकाधिक लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतात. या वर्षीही ‘बायकर्स अड्डा’ यामराठी चित्रपटातील ‘आला रे आला बाप्पा तू आला’हे गणपतीच्याजयघोषाचं जोशपूर्ण गीत गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे.
प्रशांत हळवे लिखित ‘आला रे आला बाप्पा तू आला’ या मराठमोळ्या गीताला वेस्टर्न स्टाईल टच देण्यात आला असून मराठीतला रॉक स्टार जसराज जोशी यांच्यादमदार आवाजात हे गीतं ऐकायला मिळणार आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीच्या या गाण्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक गिटारची धून ऐकायला मिळणार आहे.विशी-निमो या संगीतकाराने या गीताला तितकचं ठेकेदार संगीत दिलं आहे.विशी-निमो यांचा स्वतःचारॉकबँड असल्यामुळे ह्या गीताला वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली आहे.
संतोषजुवेकर,श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे, हृषीकेश मांडके या चार जणांवर चित्रित करण्यात आलेल्या या गीताचंनृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केलं आहे. हे गीतं पुण्याच्या प्रसिद्ध गोखले नगर मंडळ या ठिकाणी शूट करण्यात आलं असून गोखले नगर मंडळाच्या कार्यकर्त्यांचा या चित्रीकरणात सहभाग आहे. ‘बायकर्स अड्डा’च्या निमित्ताने येऊ घातलेलंगणपती बाप्पाच्या जयघोषाचं गाणंभव्यदिव्य सादरीकरणामुळेधमाकेदार झालं आहे.ठेका धरायला लावणारं हे गीत यंदाच्या गणेशोत्सवात धमाल आणेल हे नक्की.
प्रमोद मारुती लोखंडे, विजय हरिया निर्मित, आणि राजेश लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘बायकर्स अड्डा’मध्येसंतोष जुवेकर, प्रार्थना बेहेरे, श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे,देवेंद्र भगत, तन्वी किशोर, हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, आणि निखिल राजेशिर्के आदिंच्या प्रमुख भूमिका पहायला मिळतील.’बायकर्स अड्डा’चित्रपट ९ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.