पुणे :- श्री बाबा गंगाराम सेवा समितीच्या वतीने ‘श्री बाबा गंगाराम’
यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भजन संध्याचे आयोजन
करण्यात आले. भजन संध्या कार्यक्रमात जयपूर येथील प्रसिद्ध गायिका उमा लहरी
व दिल्लीचे गायक शीतल पांडे यांनी श्री. बाबा गंगाराम यांच्या विविध सुमधुर
भजनांचे सादरीकरण केले. त्यांच्या गीतांना उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.
भजन संध्या, महाआरती, नृत्यनाटिका या कार्यक्रमांचा अनेक भक्तांनी लाभ घेतला.
अल्पबचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात बंगलोर, हैद्राबाद, मुंबई पासून थेट
अमेरिकेपर्यंतचे बाबांचे भक्तगण याप्रसंगी उपस्थित होते तसेच भजनसंध्येचा आणि
महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी समितीच्या वतीने श्री बाबा
गंगाराम यांच्या साहित्यांचे आणि डीव्हीडीचे सर्व प्रेक्षकांना विनामूल्य वितरित
करण्यात आल्या.
यावेळी बाबा गंगाराम समितीचे पुण्याचे अध्यक्ष जगदीशचंद्र अगरवाल, नवलकिशोर
अगरवाल, राजकुमार अगरवाल,अशोक अगरवाल, विजयालक्ष्मी अगरवाल, विजय
अगरवाल ,अखिल अगरवाल, श्याम अगरवाल, सुजाता अगरवाल, यांच्यासह विविध
समाजातील बाबा गंगारामचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजही झुंझूनुंनगर हे गाव विष्णूचे अवतार मानले जाणाऱ्या बाबा गंगाराम
यांच्यामुळे खूप प्रसिद्ध असून त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक भक्त येथील पंचदेव
मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.