जात,पात धर्म . गाव पाहून कलावंताची किंमत करू नका ,त्याने कलेची केलेली साधना, तपश्चर्या पहा ,घेतलेली मेहनत पहा… असे आवाहन केले आणि सर्व सलाम पुणे पुरस्कारार्थी कलावंतांचे कौतूक केले
-पं . नंदकिशोर कपोते यांचे कथ्थक सादरीकरण ,नवीन प्रभाकर यांची दिलखुलास मिमिक्री , ज्येष्ठ ऑर्केस्ट्रा संयोजक मोहनकुमार भंडारी यांनी फरमाईश वर सादर केलेली गाणी , संगीतकार हर्षित अभिराज यांचे सादरीकरण , अभिनेत्री स्मिता गोंदकर हिची अदाकारी ,सतार वादन आणि तबला यांची जुगलबंदी , चांगलाच रंगतदार ठरला
मराठी आणि हिंदी सिनेनाट्य सृष्टीतील नामवंत कलाकार , निर्माते , दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके आणि पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले . अभिनेता मनोज जोशी दिग्दर्शित चाणक्य आणि अभिजित साटम निर्मित प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित सुसाट या २ नाटकांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कपोते , भंडारी , नवीन प्रभाकर आणि ‘चल हवा येवू द्या ‘ चा दिग्दर्शक अभिनेता निलेश साबळे यांना हि ‘सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर पुण्यातील उत्कृष्ट महिला शिल्पकार म्हणून सुप्रिया शिंदे यांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
पुणे युथ आयडॉल पुरस्काराने यावेळी अजित बाबर यांना तर शासकीय स्तरावरील विशेष सेवा पुरस्कार मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे आणि सामाजिक कार्याबद्दल सागर भागवत यांना सन्मानित करण्यात आले . सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर ,उपाध्यक्षा अभिनेत्री राधा कुलकर्णी ,म न से चित्रपट सेनेचे अध्यक्ष कुणाल निंबाळकर, उपाध्यक्ष प्रीती व्हीक्टर ,निर्माते एम के धुमाळ , निलेश नवलाखा , योगेश वणवे , , दिग्दर्शक शिव कदम , अभिनेता मयुर लोणकर , देवेंद्र भगत , योगेश तनपुरे , वैभव पगारे , दिनेश नेरुने ,दक्षिणेकडील ख्यातनाम अभिनेत्री डिम्पल चोपडे . यलो ची नायिका गौरी गाडगीळ , पूजा पुरंदरे,भाग्यश्री पेंध्ये ,सोनिया बर्वे आदी कलावंत उपस्थित होते . अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा वाढदिवस यावेळी केक कापून साजरा करण्यात आला
यावेळी बोलताना श्री पुरके म्हणाले ,जिवन आनंददायी बनविण्यात कलाक्षेत्राचे मोठे योगदान आहे . १० वर्षे मी नाटकात काम केले आहे मधुसूदन कानेटकरांच्या नाटकात स्त्रीची भूमिका केली , गाणी म्हणण्याचा हि शौक आहे , ताणतणावाच्या जीवनात आनंदाचे क्षण भरण्याचे काम कलावंत करतात रंगभूमी , सिनेमा आणि टी व्ही आणि संगीत क्षेत्रातील मंडळी त्यासाठी आपले कसब पणाला लावतात ,आयुष्य वेचतात त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे अशा कलाकारांच्या पाठीवर थाप देवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे काम करणाऱ्या ‘सलाम पुणे’ ला माझा सलाम …. हि वैभवशाली परंपरा अशीच पुढे न्यावीअसे आवाहन माजी शिक्षणमंत्री प्रा . वसंतराव पुरके यांनी येथे केले. वादक भाग्यश्री पेंध्ये ,अभिनेता नवीन प्रभाकर , अभिनेत्री राधा सागर नर्तक विद्यासागर , साहिल मरगजे,संगीतकार हर्षित अभिराज आदींनी यावेळी आपली कला सदर केली . सलाम पुणे चे कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले


























