अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा
नवी दिल्ली – काल रात्री निघालेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा आज सकाळी भारतात पोहोचल्या आणि भारतीय सरकारने मिडीयाने त्यांचे भार्बाहारून स्वागत केले -ओबामांच्या या भेटीने उत्सुकता कुतूहलता याला जणू भारतात बहारच आली असून , त्यांच्या उपस्थितीत होणारा उद्याचा प्रजासत्ताक दिन सोहळा आणि त्यापूर्वीचे कार्यक्रम भारतीय नागरिक मोठ्या कुतूहलाने पाहत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरद्वारे औपचारिक स्वागत करण्यात आले. ओबामांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ओबामा राजघाटाकडे रवाना झाले. सकाळी ओबामांचे आगमन झाले त्यावेळी पंतप्रधान मोदी स्वतः प्रोटोकॉल मोडून ओबामांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अधिकार्यांची उपस्थिती होती. विमानातून उतरताच ओबामा आणि हस्तांदोलनानंतर गळाभेट घेऊन दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
भारत दौर्यात मोठ्या घोषणा करणार असल्याचे अमेरिकेेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती भवनात पत्रकारांशी बोलताना ओबामांनी ही घोषणा केली. या दौर्यात भारताने तुमच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे पत्रकारांनी ओबामांना विचारले होते. दरम्यान, मोदी आणि ओबामा यांच्यात शिखर चर्चेला सुरुवात झाली आहे.
दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरद्वारे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजघाटावर जाऊन ओबामांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. भारतात करण्यात आलेल्या शानदान स्वागताबाबत त्यांनी आभरही मानले.
राजघाटावरून बराक ओबामा हैदराबाद हाऊसकडे रवाना झाले आहेत. त्याठिकाणी मोदी आणि ओबामा यांच्यात शिखर चर्चा होणार आहे. त्याआधी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामांचे स्वागत केले होते. दरम्यान, ओबामांचा भारत दौरा सुर होताच व्हाइट हाऊसतर्फे जय हिंद असे ट्वीट करण्यात आले. हा दौरा भारत अमेरिका मैत्रीची नवी सुरुवात ठरेल असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
त्याआधी पंतप्रधान मोदी हे स्वतः प्रोटोकॉल तोडून ओबामांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अधिकार्यांची उपस्थिती होती. विमानातून उतरताच ओबामा आणि हस्तांदोलनानंतर गळाभेट घेऊन दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
8.10 AM भारतीय आणि अमेरिकेचे अधिकारी पालम विमानतळावर पोहोचले. ओबामांच्या स्वागताची तयारी.
9.40 AM ओबामांचे विमान विमानतळावर उतरले.
9.45 AM ओबामा आणि मिशेल विमानतळातून बाहेर आले .
9.48 AM पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बराक ओबामा आणि मिशेल ओबामांचे केले स्वागत.
10.15 AM मौर्य शेरटनमध्ये पोहोचले बराक आणि मिशेल ओबामा.