बजरंगी भाईजान ईद ला येणार -पहा मेकिंग ची झलक
यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमा च्या ट्रेलरच्या मेकिंगचा व्हिडिओ 7जूनला रिलीज करण्यात आलाय. 1.40 मिनिटांच्या या व्हिडिओत सिनेमाचे बिहाइंड द सीन्स दाखवण्यात आले आहेत. यापैकी अनेक सीन्सची झलक आपल्याला टीजरमध्ये बघायला मिळाली आहे. व्हिडिओत सेल्फी ले ले रे गाणे, काश्मीर, सलमान-करीनाची सायलिंगसह अनेक सीन्स बघायला मिळत आहेत. एका सीनमध्ये दिग्दर्शक कबीर खान चित्रपटात काम केलेल्या लहान मुलीला सीन समजावतांना दिसतायेत.
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा सलमान खान फिल्म्स या बॅनरमध्ये तयार झाला आहे. सलमानसह या सिनेमात करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.