(पहा १५ फोटो )


मुं बई- मनसेच्या वतीने जुहू-चोपाटी येथे मराठी नववर्षाचे जोरदार स्वागत केले गेले. मनसेच्या वतीने 100 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे. ही गुढी जुहूमध्ये आकर्षण ठरत आहे. हिंदू नववर्ष गुढी पाडवाच्या निमित्ताने आज सकाळी जुहु चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी १०० फुट उंच गुढी उभारून ढोलताशांच्या गजरात हत्तीवरून साखर वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमित राज ठाकरे ,पुष्कर श्रोत्री , अनिकेत विश्वासराव राजेश श्रुंगारपुरे, अनंत जोगउपस्थित होते.
दरम्यान, मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ढोल-ताशा, लेझिम पथके व नाशिक पद्धतीच्या ढोलवर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या समारंभासाठी अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांनी हजेरी लावली व गुढीची पूजा केली. यावेळी तमाम मराठी कलाकार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, शशांक नागवेकर यांनी केले होते. अमिताभ बच्चन यांनीही तमाम मराठी जनांना गुढी पाडव्यानिमित्त मराठमोळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत मराठी वस्ती असलेल्या गिरगावात गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. डोंबिवलीतही भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील शोभायात्रेला हजेरी लावली. त्यांनी यावेळी मराठी जनांना शुभेच्छा दिल्या.

