पुणे, – सुरक्षित आणि निर्धोक एटीएम याचबरोबर ऑनलाइन होणार्या व्यवहारांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आता पूर्वी वितरित केलेल्या जुन्या मॅगस्ट्रिप कार्डाऐवजी नव्या आणि सुरक्षित ईएमव्ही प्रणालीचे कार्ड आपल्या सर्व ग्राहकांना बदलून देईल. या नव्या गुणवत्तेची कार्डस आपल्या सर्व ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बँकेने विविध उपाययोजना केल्या असून मॅगस्ट्रिप कार्डधारकांच्या निदर्शनास कार्डबाबत सुधारणांचे बदल निदर्शनास आणून दिले आहेत आणि त्यांना नवीन ईएमव्ही प्रणालीचे कार्ड बदलून घेण्याचीदेखील विनंती केली आहे.
बँकेच्या कोणत्याही शाखेमधून बँकेचे ग्राहक नव्याने सुधारीत असलेली ईएमव्ही कार्डस बदलून घेऊ शकतात. यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन एक अर्ज भरल्यास ग्राहकांना नवीन सुधारित ईएमव्ही कार्ड दिले जाईल. ग्राहकांनी नवे कार्ड स्वीकारल्यानंतर ताबडतोब चोवीस तासाच्या आत नव्याने दिलेले ईएमव्ही चिपसह असलेले डेबिट (एटीएम) कार्ड सक्रिय केले जाईल.
बँकेचे ग्राहक ही नेहमीच बँक ऑफ महाराष्ट्रची प्राथमिकता असल्याने कार्ड बदलून देण्याच्या कार्यास प्राधान्य देण्यासंबंधी बँकेच्या सर्व शाखाना निर्देश दिले गेले आहेत. हे कार्य जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आमच्या सर्व कर्मचार्यांना मार्गदर्शन दिले गेले असून फॉर्म भरल्यानंतर 20 मिनिटांमध्ये जुने कार्ड खात्रीपूर्वक बदलून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सर्व क्षेत्रीय आणि नोडल शाखांकडे असलेल्या उपलब्ध कार्डाची संख्या तपासून बँक वेळोवेळी अतिरिक्त कार्डे पुरविते. ग्राहकांना जुने कार्ड बदलून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बँकेने किमान वेळेत कार्ड्स सक्रिय करण्याचा प्रयत्न केला असून बँकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये / नोडल शाखांमध्ये पुरेसे कार्ड वेळेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र जुन्या चुंबकीय पट्टीच्या कार्डाऐवजी आता अधिक सुरक्षित कार्ड बदलून देण्याचे कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशांनिर्देशांप्रमाणे करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी घालून दिलेल्या मुदतीमध्ये सर्व कार्डांच्या बदली पूर्ण करण्याच्या बँकेची योजना आहे.