पुणे- सरकार कोणतेही येवू द्यात पुणे पोलिस आज्ञाधारक च असावेत असे वाटावे या पद्धतीने पुण्यात हेल्मेट सक्तीचा डाव रचला जात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दारात आता दीड रुपयाने आली आहे मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयाने कपात होण्याचे संकेत मिळत असताना केंद्र सरकारने अबकारी करात वाढ केल्याने पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर दीड रुपयाने महागले आहे. सरकारच्या कठोर निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने आज (गुरुवारी) अचानक पेट्रोल- डिझेलवरील अबकारी करात जवळपास दीड रुपयाने प्रतिलिटर वाढ केली. अनब्रांडेड डिझेलवरीलअबकारी कर वाढवून 2.96 रूपये तर ब्रांडेड डिझेलवरीलअबकारी 5.25 रूपये केला आहे. तसेच अनब्रांडेड पेट्रोलवरीलअबकारी कर 2.70 रूपये तर ब्रांडेड पेट्रोलवरील अबकारी कर 3.85 रूपये केला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत असल्याने पेट्रोलसह डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वेळा कमी झाले होते.