फार्मा क्रिकेट चेम्पियन राज्य स्तरीय स्पर्धेत अल्लाना कॉलेज विजयी
पुणे :
फार्मा क्रिकेट चेम्पियन स्पर्धेत यजमान अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ने विजय मिळवला . आझम कॅम्पस मैदानात ५ नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ झाला . या ३ दिवसीय राज्य स्तरीय स्पर्धेत १७ महाविद्यालयांनी भाग घेतला .
अंतिम सामना सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी आणि अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात झाला . संस्थेचे सहसचिव इरफान शेख आणि प्राचार्य किरण भिसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले . गुलझार शेख ,डॉ एजाज शेख ,रजत सय्यद उपस्थित होते