पुणे- दिवाळी हा दिव्यांचा सण आहे उत्सव आहे, फटाक्यांच्या आतिषबाजी पूर्वी कायदे समजून घ्या , फटाके वाजविताना स्पर्धा करू नका … जास्त अति मौज हि करू नका कारण जर कोणीही तक्रार केली तर तुम्ही कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकू शकता आणि पोलिसांना तक्रार दाखल करून घ्यावीच लागेल हे हि लक्षात असू द्यात
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांविषयी काय कायदे आहेत हे समजून घ्या असे सांगणारे परिपत्रक पोलीस आयुक्तालयाने माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी पाठविले आहे
नेमके यात काय म्हटले आहे ते पाहू यात
१) दिवाळी निमित्त १९ नोव्हेंबर पर्यंत तात्पुरते फटाके विक्री परवाने
२)महाराष्ट्र शस्त्र अधिनियम १५४ (३) अन्वये ४२.३४ ग्राम -५.७१५ से मी लांबीचा व ३. १७५ से मी व्यासाचा दोर्याने गुंडाळलेला अटम्बोंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे . उत्पादनास- विक्रीस आणि बाळगण्यास आणि वापरण्यासहि …
३)मुंबई पोलीस अधिनियम १९५१ पोटकलम ३३ यु मधील तरतुदीनुसार …
कोणत्याही रस्त्यात आणि रस्त्यापासून १० मीटर पर्यंत च्या अंतरात … सर्व प्रकारचे फटके वाजविणे-उडविणे यास बंदी – ते आवाजाचे असो व नसो …
याच कायद्यातील कलम २ चे पोटकलम १५ अन्वये कोणतीही आळी. चाळ, महामार्ग, पूल घाट जिथे रहदारी असो वा नसो इथे हि हि बंदी कायम असेल
यांचे उल्लंघन करनाऱ्यावर कलम १३१ (१५)सह (i)नुसार कायदेशीर कारवाई होईल
४) १०० हून अधिक फटाक्यांच्या माळा वर सर्वप्रकारची बंदी
५)१२५ डेसिबल हून अधिक आवाजाच्या फटाक्यांवर बंदी
६)रात्री १० ते सकाळी ६ आवाज करणारे फटाके वाजविण्यास बंदी …
७)रुग्णालये , शैक्षणिक संस्था , न्यायालये असलेल्या शांतता झोन मध्ये कोणत्याही वेळेत फटके वाजविण्यास बंदी
यांचे उल्लंघन कोणी करीत असेल आणि त्रास होत असेल अशा नागरिकांनी याबाबत तक्रारी कराव्यात … या कायद्यांतर्गत पोलिसांना तक्रार दाखल करवून घ्यावी लागेल