पुणे- मानवाधिकार संघटनेच्या सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रीती व्हिक्टर यांना साई महाराष्ट्र गौरव पुरस्काराने येथे सन्मानित करण्यात आले .
वडगाव शेरी येथील श्री साई प्रतिष्ठान आणि नगर रोड लायन्स क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या साई महाराष्ट्र गौरव २०१५ या कार्यक्रमात प्रकाशक प्रमोद आडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रीती यांना प्रदान करण्यात आला . यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे , विपश्यना केंद्राचे संचालक दत्ता कोहिनकर साईप्रतिष्ठान चे संजय चौधरी ,लायन्स क्लब चे प्रांतपाल श्रीकांत सोनी आदी मान्यवर उपस्थित होते .