
पिंपरी- विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यगुणांना वाव देण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविदयालयातील एमसीए विभागांतर्गत इन्स्पेरीया 2016 या राज्यस्तरीय टेक्नो मॅनेजमेंट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी संपन्न झाला. या वेळी इन्स्पेरीया 2016 चषकाचे मानकरी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विश्वस्त भाईजान काझी व प्राचार्य प्रा. ए.एम. फुलंबरकर चषक देऊन गौरविण्यात आले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था यावर्षी आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या संस्थेच्या आकुर्डीतील शैक्षणिक संकुलात 7 महाविद्यालये आहेत. यामधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए विभागांतर्गत ‘इन्स्पेरीया 2016 राज्यस्तरीय टेक्नो मॅनेजमेंट स्पर्धे’चे बुधवार (दि.17) व गुरुवारी (दि.18) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ संस्थचे विश्वस्त भाईजान काझी, प्रा. ए. एम. फुलंबरकर, एमसीए विभागप्रमुख प्रा. अंजना अरकेरीमठ, प्रा. प्रशांत कुलकर्णी, समन्वयक प्रा. सोपान आघाव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेत राज्यभरातील 200 महाविद्यालयातून 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय पुणे या महाविद्यालयाने इन्स्पेरीया 2016 चषक पटकाविला. तर सी प्रोग्रामिंग या स्पर्धेत नूर पिरसाब, अतिष शेटे (प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय पुणे) रोडीज स्पर्धेत भानुप्रसाद सोनवणे (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे), एस.क्यू. एल. मास्टर या स्पर्धेत गौतम चिलकला (सिंहगड कॉलेज, वडगाव), ह्यूमन चेस या स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आकुर्डी गट यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाने पटकाविला ‘इन्स्पेरीया 2016 चषक’
Date:

