पुण्यातील खिर्स्ती मंडळांच्या संयुक्त विद्यमाने ” प्रभू येशु जन्मोत्सव सोहळा ” उत्साहात संपन्न झाला . पुणे कॅम्प भागातील पुलगेटजवळील सेंट मेरी चर्च ग्राउंडवर झालेल्या प्रभू येशु जन्मोत्सव सोहळयास राज्याचे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे ,बिशप एन. एल . करकरे , बिशप अन्डरु राठोड , जस्टस देवदास , अबडन्ट लाईफ इंटरनेशनल बिशप डॉ. जेरी जे. डिसोझा , अजय भोसले , रेव्ह. आर. जे. रंजी बाबू , जोशुआ रत्नम , डॉ. संजय कोरे , हनुमंत साठे , विनोद मथुरावाला , नाना दार , डॉ. राहुल जेकब आदी मान्यवर व ख्रिस्त बांधव , शहरातील अनेक चर्च पाळक उपस्थित होते .
यावेळी प्रभू येशु जन्मोत्सव सोहळ्यानिमित दिलीप कांबळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला . यावेळी सर्व उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात या संगीतमय संध्या मध्ये सहभागी होऊन प्रभू येशु ख्रिस्त जन्मोत्सावामध्ये सहभागी झाले . यावेळी पुणे शहरातील अनेक ख्रिस्ती चर्चमधील युवकांनी विविध नृत्याद्वारे जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते . यावेळी मेंढपाळाचा गोठा सादर केला होता . यावेळी स्पायसर विद्यापीठातील युवकांनी वाद्ये वाजवून संगीत सादर केले . यावेळी ख्रिस्त समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये बिशप एन. एल . करकरे व जस्टस देवदास यांना स्मृतीचिन्ह , शाल , पुष्पगूछ देऊन बिशप अन्डरु राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . या व्यक्तींच्या कार्याचा परिचय जोशुआ रत्नम यांनी करून दिला .
यावेळी उपस्थितांचे स्वागत रेव्ह. आर. जे. रंजी बाबू यांनी केले तर रेव्ह. बालचंद शेजुले यांनी प्राथर्ना केली तर सूत्रसंचालन नेहा लोंढे व इस्टर दार यांनी केले तर आभार डॉ. संजय कोरे तर सांगता प्राथर्ना बिशप अन्डरु राठोड यांनी मानले .
यावेळी राज्याचे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , प्रभू येशु ख्रिस्तानी जगाला शांतीचा संदेश दिला , त्या संदेशाचे पालन करणारे ख्रिस्त समाजात आज ” प्रभू येशु जन्मोत्सव सोहळा ” साजरा होत आहे . या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त झाले .हा खरोखरच आनदांचा क्षण आहे . नाताळ व नवीन वर्षाच्या त्यांनी ख्रिस्त बांधवाना त्यांनी शुभेछा दिल्या .