पुणे : माळवाडी, पॉप्युलरनगर परिसरात आज सकाळी यशोदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे वीजबचतीसाठी नागरिकांचे प्रबोधन केले. प्रभात फेरीमधील वीजबचतीच्या घोषणा व फलके नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
या प्रभात फेरीत यशोदीप विद्यालयातील सुमारे 800 विद्यार्थ्यांसह महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, महात्मा फुले विद्यानिकेतनचे संस्थापक व सचिव श्री. रतन माळी, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, श्री. धर्मराज पेठकर, मुख्याध्यापक सौ. नीता गुंजीकर व सौ. मंगला जावळे तसेच महावितरणचे सुमारे 75 कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.
महावितरणच्या वतीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या सहकार्याने ही प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली.
प्रभात फेरीनंतर आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला व वीजबचतीचे महत्व पटवून दिले. संस्थेचे सचिव श्री. माळी यांच्यासह सेवानिवृत्त अभियंता श्री. मनोहर कोलते यांनी प्रात्यक्षिकांसह वीजबचतीवर मार्गदर्शन केले. या विद्यालयातील नाजमा शेख हिने वीजबचतीवर वीजबचतीचे महत्व पटवून दिले. यावेळी नाजमा शेख हिचा मुख्य अभियंता श्री. मुंडे यांच्याहस्ते कौतुकपर गौरव करण्यात आला.
प्रभातफेरीमध्ये उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय साळी, श्री. रमेश लोकरे, सेवानिवृत्त अभियंता श्री. मनोहर कोलते, सहाय्यक अभियंता दयासिंग मोहिते, धनंजय देशपांडे, अतुल देशपांडे, संजिवनी नारखेडे, सुनील जगताप, सचिन वीर आदींसह शिक्षकवृंद, विद्यार्थी व महावितरणचे अधिकारीस, कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्यकंटेश देशमुख यांनी केले तर श्री. ढालपे यांनी आभार मानले. आयोजनसाठी श्री. मनोहर कोलते, महावितरण, महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेने पुढाकार घेतला