पोलिसांसाठी ” मोफत हृद्य रोग तपासणी शिबीर ” संपन्न

Date:

unnamed1

पुणे- पुणे कॅंटोन्मेंट शांतता समिती , लष्कर पोलिस ठाणे , हिंद तरुण महिला मंडळ व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅम्प भागातील लष्कर पोलिस ठाणे मध्ये सवांद सभागृहात पोलिस बांधवासाठी ” मोफत हृद्य रोग तपासणी शिबीर ” संपन्न झाले . या शिबिरात २१० पोलिस बांधवांची हृद्य रोग तपासणी करण्यात आली .

   या शिबिराचे उद्घाटन लष्कर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त आत्मचरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , गुन्हे शाखा पोलिस निरीषक अनिल नाडे ,पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरमकर ,  हिंद तरुण महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी गिरमकर , सह्याद्री हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक घोणे ,  पुणे कॅंटोन्मेंट शांतता समिती सदस्य मनजितसिंग विरदी , संदीप भोसले , बलबीरसिंग कलसी आदी मान्यवर व अन्य सदस्य उपस्थित होते .

    या शिबीराचे आयोजन हिंद तरुण महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी गिरमकर ,आशा गिरमकर , माधवी मेटेल्लु . अर्चना दंडे , सविता ठाकूर , प्रियांका भंडार , मंगल परदेशी , राजश्री कुराडे , विद्या कोतवाल , निशा कुराडे आदींनी केले होते .

   शिबिरासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे हृद्यरोग तज्ञ  डॉ. महेंद्र बाफना , डॉ. जगदीश देवरे , डॉ. मनिषा जगदाळे , टेक्निशियन हरीश ब्रदर , हिमानी पवार , कर्मचारी वर्ग शरद काथवटे , मंगेश पाटील , दीपक कालिगंदा आदींनी विशेष परिश्रम घेतले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...