पुणे :
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान साक्षरता गरीब आणि मागास वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने पी.ए.इनामदार खउढ अॅकॅडमीतर्फे (इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) संगणक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात 7 कार्यशाळांचा समावेश आहे. अॅकॅडमीच्या वतीने प्रा. मुमताझ सय्यद आणि प्रा. ऋषी आचार्य यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमधील शिक्षकांसाठी विनामूल्य कार्यशाळा घेण्यात आली. पालिकेच्या उर्दू शाळांमध्ये 17 शिक्षकांसाठी विनामूल्य कार्यशाळा घेण्यात आली. पहिली ते 7 वीपर्यंत ई-लर्निंगचे उर्दू सॉफ्टवेअर तयार करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले.
विषय शिक्षकांसाठी झालेल्या कार्यशाळेत 147 विषय शिक्षक सहभागी झाले. याशिवाय इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण पुण्याबाहेरील 19 प्रशिक्षकांना देण्यात आले. एकूण 43 ठिकाणी पी.ए. इनामदार कॉम्प्युटर सेंटर आहेत. त्यातील मुलांच्या 247 पालकांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षांत आठवीपर्यंतच्या 110 विद्यार्थ्यांना आयपॅड वर अध्ययन करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी दिली. ‘संगणक आणि माहिती तंत्रज्ञानात केवळ सधन वर्गाची प्रगती होऊन चालणार नाही. तळागाळातील वर्गापर्यंत ही क्रांती पोचली नाही तर मोठी सामाजिक दरी उभी राहून असंतोष तयार होऊ शकतो. त्यामुळे या विनामूल्य अभियानाद्वारे उन्हाळी सुटीतील वेळ कारणी लाऊन आम्ही संगणक आणि माहिती तंत्रक्रांती शेवटच्या घटकापर्यंत पोचवत आहोत,’ असे ते म्हणाले.