पुणे :
“पॅरीस जागतिक हवामान परिषद 2015′ (COP 21) मध्ये खासदार वंदना चव्हाण यांनी सहभाग घेतला. इंग्लंडचे माजी उपपंतप्रधान लॉर्ड प्रेसकॉट, न्युझिलंडचे खासदार ग्रॅहम केनेडी, निकोलस स्टर्न, सबीर चौधरी यांच्या बरोबर समूह चर्चेत भाग घेतला. “क्रेडिबिलिटी ऑफ नॅशनल ऍक्शन्स्’ या परिसंवादात त्यांनी 8 डिसेंबर रोजी भाग घेतला.
खा.वंदना चव्हाण या “ऍलर्ट’ (असोसिएशन फॉर लिडरशीप एज्युकेशन रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग) या संस्थेच्या संस्थापक असून, अनेक पर्यावरणविषयक लढे त्यांनी दिले आहेत. अनेक जागतिक, राष्ट्रीय परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. पॅरीस क्लायमेट कॉन्फरन्समध्ये 50 हजारांहून अधिक सरकारी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक यात सहभागी झाले आहेत.


