अहमदनगर- आमच्या मागण्या आम्ही सोडून दिलेल्या नाहीत , सरकार कोणाचे का असेनात , परदेशी बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा आणि त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर आंदोलन करणार असा इशारा आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे
परदेशी बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याच्या मुद्द्यावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले , यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. शंभर दिवसांत काळा पैसा पर आणू या घोषणेचा केंद्रातील भाजप सरकारला विसर पडला काय असा सवाल हजारे यांनी केला आहे.
परदेशात भाषणं करून प्रश्न सुटणार नाहीत, दिलेली वचनं पाळा असा सल्ला हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. सार्वजनिक हितासाठी तांत्रिक मुद्दे नव्हे तर नैतिकतेला महत्त्व द्या असंही हजारे यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी, परदेशी बँकांमध्ये ठेवलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आणि त्या खातेदारांची नावे जाहीर करण्याचे तोंड भरून आश्वासन देत सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारने काल, शुक्रवारी यूपीएच्या पावलावर पाऊल टाकत खातेदारांची माहिती उघड करण्यास सुप्रीम कोर्टात नकार दिला होता. काळ्या पैशांसंदर्भातील माहिती देणाऱ्या देशांशी भारताचा ‘दुहेरी करनिर्धाण करार’ (डीटीएए) असून, त्याअंतर्गत ती माहिती उघड करता येत नसल्याचे सरकारने म्हटले होते.