पुणे-ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या पुणे शहर जनसंपर्क कार्यालयास पक्षाचे आमदार इम्तियाझ जलील सय्यद यांनी भेट दिली . पुणे कॅम्प भागातील सेंटर स्ट्रीटवरील कुरेश नगरमधील ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांचे स्वागत पक्षाचे सरचिटणीस जावेद आलमेलकर यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुछ देऊन स्वागत केले . यावेळी ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमीन या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी आमदार इम्तियाझ जलील सय्यद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमीन हा पक्ष आहे . फक्त मुस्लिम बांधवांचा हा पक्ष असल्याचे समाजामध्ये चित्र रंगविले जात आहे . परंतु प्रत्यक्षात तसे काही नाही , याउलट नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व समाजाला निवडणूक लाधाविण्याची संधी दिले आहे . देशाला स्वांतत्र्य मिळाल्यापासून देशामध्ये त्याच त्याच प्रश्नावर निवडणुका लढविल्या जात आहेत त्यासाठी देशातील प्रश्न मुळापासून निपटून काढण्यासाठी आपला पक्ष काम करणार आहे .
यावेळी पक्षाचे मोबीन खान , शानवाझ तारकश , मझहर शेख , समीर सय्यद , नासीर शेख , बिलाल आलमेलकर , इस्माईल मोमीन , मोहमदअली कुरेशी , अर्षद टाकसाल , शाहरुख शेख , रिझवान कुरेशी , फैजअली कुरेशी , दिशान शेख , शाहरुख पानसरे , फैयाज खान , उबेद मेमन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी अल कुरेश यंग सर्कल आणि अल कुरेश लबैइक यंग सर्कलच्यावतीने त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले .