पुणे- पुण्यात उच्च न्यायालय खंडपीठ झालेच पाहिजे या मागणी साठी गेल्या 15 पंधरा दिवसा पासून वकिलांचे
आंदोलन सुरु आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्या साठी मनसे ने आज पुढाकार घेतला व पाठिंबा असलेले सह्यांचे पत्र स्वाधीन केले. वसंत मोरे ,गणेश सातपुते ,वसंत खुटवड , रवी सहाने आदी मान्यवर मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ,नगरसेवक ,महिला सेना , पर्यावरण सेना ,विद्यार्थी सेना ,रस्ते आस्थापन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1978 साली विधिमंडळात पुणे आणि औरंगाबाद येथे उच्च्य न्यायलय करण्याचा ठराव समंत झाला होता, 1981 साली औरंगाबाद येथे उच्च्य न्यायलय झालेही पणपुणे शहरात अजुन झाले नाही , पुणे शहरातील 40% केसेस उच्च्य न्यायालयात जातात.यात सामान्य नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
हे फ़क्त वकिलांचे आंदोलन नसून जनतेचे आहे आणि जनते साठी मनसे पाठिंबा दिला आहे व पुढे ही देत राहील.असे यावेळी मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले .