पुण्यातून ‘डायल 108’सेवेच्या 20 रूग्णवाहिका नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना
पुणे :
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या 20 रूग्णवाहिका पुणे जिल्ह्यातून रवाना करण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकांमध्ये 5 रूग्णवाहिका ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ (अङड), 15 रूग्णवाहिका ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ आहेत. तसेच रूग्णवाहिकांमधून 20 डॉक्टर्स आणि वाहनचालकांची टिम रवाना झाली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
कुंभमेळ्यामध्ये ‘डायल 108’ सेवेद्वारे आत्तापर्यंत 165 रूग्णांना आपत्कालीन मदत तर 5331 रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, ‘डायल 108’ सेवेच्या एकूण 30 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 12 त्रंबकेश्वर येथे तर नाशिक येथे 18 रूग्णवाहिका 24 तास सेवेसाठी राहणार आहेत.
नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 1 कोटीहून अधिक भाविक येतात त्यामुळे मोठ्याप्रमाणात चेंगराचेंगरी किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्राण वाचविण्याच्या ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठी ‘डायल 108’च्या रुग्णवाहिका कुंभमेळ्यामध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत राहणार आहेत. अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे जिल्हा व्ययस्थापक डॉ. गजानन पुराणिक यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी कार्यरत वाहनचालक, डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, शासकिय सेवेतील डॉक्टर्स, प्रायव्हेट डॉक्टर्स आणि इतर प्रतिनिधी यासर्वांना ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले.