रायपुर – नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील तिनही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका झाली आहे. तिघेही सध्या चिंतलनार पोलीस ठाण्यात असल्याचीही माहिती रविवारी संध्याकाळी बस्तर पोलिसांनी दिली आहे.भारत जोडो अभियानात सहभागी झालेल्या आणि शांतीचा संदेश देणारे
हे विद्यार्थी पुणे ते ओडिसा व्हाया छत्तीसगड दरम्यानच्या सायकल रॅलीत सहभागी झाले होते.
विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्णा शेवाळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी २० डिसेंबरला पुण्यातून सायकल चालवत छत्तीसगडमार्गे ओडिशात जाणार होते. मात्र नक्षलवाद्यांनी या तीन विद्यार्थ्यांचं अपहरण केलं होतं.