सिंहगड वोरियर्स (ओनर-योगेश भोसले ), रियल केसरी (ओनर – कार्तिक केंढे ),रॉयल हडपसर( नितीन कोंढा ळकर ), कलावंत पेशवाज (ओनर-कलावंत फौन्डेशन ), श्रीमंत कसबा ११ (ओनर -प्रशांत सोलापूरकर ), पिंपरी चिंचवड मोरायाज (ओनर -अजिंक्य जाधव ), कोथरूड इंफिल्ड्स (ओनर-सागर पाठक ),डेक्कन सुपर मराठाज (ओनर -जीत मोर्या )असे आठ संघ मैदानात उतरणार आहेत .
पुण्यातील कलाकारांचे रंगणार क्रिकेट सामने – २५ मे पासून आठ संघ खेळणार १५ सामने …
पुणे- पुणे -पिंपरी चिंचवड परिसरातील सिने नाट्य सृष्टीतील कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्यातील क्रिकेट सामन्यांची घोषणा आज एस एम जोशी सभागृहात करण्यात आली. कुणाल निंबाळकर , विनोद राजपुरोहित आणि आशिष जैन या तीन आयोजकांनी आज सहभागी कलावंत आणि तंत्रज्ञ तसेच मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत ‘पुणे क्रिकेट लीग ‘ ची स्थापना; लोगो आणि संघ जाहीर केले . येत्या २५ मे ते ३१ मे या कालावधीत सहकारनगर मधील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर हे सामने होत असून सुमारे २०० कलाकार आणि तंत्रज्ञ यात सहभागी होत आहेत
गणेश सातपुते ,बाळासाहेब गव्हाणे ,प्रीती व्हिक्टर ,सलाम पुणे चे कार्याध्यक्ष संतोष चोरडिया ,दिग्दर्शक कौस्तुभ कुलकर्णी , निर्माते निलेश नवलाखा , मेघराज भोसले , तसेच सिद्धेश्वर झाडबुके ,आस्ताद काळे निखिल वैरागर ,रोहन मंकणी सचिन गवळी ,तेजस कुलकर्णी , केतन चावडा ,अमित कल्याणकर, सागर पाठक , केतन लुंकड , विजय वाघचौरे, संजय ठुबे, विजय पटवर्धन , प्रशांत सोलापूरकर , क्षितीज कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते