पुणे- बॉलिवूडशी संबंधित वादग्रस्त शो एआयबी (ऑल इंडिया बकचोद) च्या आयोजकांनी 7 मार्च रोजी पुण्यात होणारा लाईव्ह शो रद्द केला आहे. शो रद्द झाल्याची माहिती एआयबीच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या शो नंतर याबाबत वाद उसळला होता . गेला दीड महिना आम्ही या भानगडीत अडकून पडलो आहे. मात्र, यातून आम्ही बाहेर येत लवकरच नव्या शो द्वारे तुमच्यासमोर येऊ. शो रद्द करावा लागल्याने तुम्हाला जो मनस्ताप झाला आहे त्याबद्दल आम्ही खेद करतो. तुमच्या तिकीटाचे पैसे सात दिवसात परत केले जातील.