४१ वी इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडेरेशन आयोजित केंद्रीय क्रीडा युवक संचालनालय व इंटरनेशनल एशियन पॉवरलिफ्टिंग फेडेरेशन आणि इंडियन ओलम्पिक असोसिएशनमध्ये पुण्याच्या मझहर यासीन खान याने ” सिनियर नेशनल पॉवरलिफ्टिंग चेम्पशियनशिप ” जिंकली .
मझहरने ९३५ किलो ग्रेमचा भार उचलला . ३६०किलो ग्रेममध्ये स्क्वेड मारले , २४५ किलो ग्रेम बेंच प्रेस मारले , तर ३३० किलो ग्रेम डेड लिफ्ट मारले . रेलवे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड्स यांच्यावतीने मझहर खेळला . हि स्पर्धा उताराखंडमध्ये काशीपुर येथे पार पडल्या . रेल्वेच्या मझहर खानने ९३५ किलोचा भार उचलून जबरदस्त उत्साह दाखविला . इंडियन रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रक्शिशक (अर्जुन पुरस्कार विजेते ) संजीवन भास्करन यांचे मार्गदर्शन लाभले .
मझहर खान हा पुणे रेल्वे स्थानकात विद्युत विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत .