पुणे:
पुण्याच्या प्रश्नांवर उत्तरे देण्यासाठी भाजपच्या सहा आमदारांनी‘ फ्रेंडस् ऑफ बीजेपी’कडे पाठ फिरविली मात्र एकट्या दिलीप कांबळे यांनी प्रश्न गंभीर असले तरी राज्य शासनाकडे उत्तरे आहेत असे प्रतिपादन केले
‘ कायद्यातील तरतुदीनुसार मनपा च्या विकास आराखड्यात बदल करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत ,त्याचा वापर करून पुणेकरांना मोकळा श्वास घे ता येईल असा विकास आराखडा देण्याची ,त्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची आणि कचरा ,वाहतूक ,महिला सुरक्षे सहित सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही आज भाजपच्या दिलीप कांबळे यांनी दिली
‘फे्रंडस ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सह समन्वयक उषा बाजपेयी आणि ‘कुमार सिटी लेडीज् असोसिएशन्स्’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील सर्व आमदार आणि नागरिक यांच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे (जनसंवाद २०१५ ) आयोजन रविवारी शनिवार वाड्यावर करण्यात आले होते .
या चर्चासत्राद्वारे पुणे शहरातील प्रश्न व नागरिकांच्या समस्या याबद्दल पुण्यातील नागरिकांनी ८ पैकी केवळ २ आमदारांशी संवाद साधला
शहरातील नागरिकांच्या मिळकतकरात वाढ करण्याच्या प्रस्तावास भाजपने पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. त्यावरून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ‘करवाढ का केली आणि पक्षाने त्याला पाठिंबा का दिला, हे कळत नाही,’ अशा शब्दांत घरचा आहेर दिला. तुम्ही शहराचे वाटोळे करायचे आणि आम्ही त्याला समर्थन द्यायचे, हे मला एक पुणेकर म्हणून पटले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
श्री कांबळे म्हणाले ,’ वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली असून तीन महिन्यांनी त्यांना संपूर्ण जबादारी देण्यात येईल . कचरा टाकण्यासाठी वन विभागाची जमीन देण्यासह सर्व उपाय योजना केल्या जात आहेत . प्रश्न गंभीर असले तरी राज्य शासनाकडे त्याची उत्तरे आहेत ,गैर कारभारात भाजप चे कोणीही लोक प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत असेही त्यांनी सांगितले
विकास आराखड्यातील तज्ञ समितीच्या अहवालातील पाने बदलण्याच्या प्रकारच्या गुप्तचर चौकशीची मागणी करू असे संदीप खर्डेकर यांनी सांगितले .
झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा आणि नवी अनधिकृत बांधकामे थांबविण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार भीमराव तपकीर यांनी सांगितले देशभरात घडणाऱ्या घटना म्हणजे भाजपसाठी वेकअप कॉल आहे, त्यामुळे आपण जे करीत आहोत, तेच बरोबर आहे, असे समजू नका, असा सल्ला माजी प्राप्तिकर आयुक्त संतोष दत्त यांनी यावेळी दिला. तसेच सत्ता येऊन कमी कालावधी झाला असला, तरी दैनंदिन जीवनात काही फरक पडला आहे का, असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे, त्यामुळे आताच सावध व्हावे, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन यांनी दिला. या वेळी उषा वाजपेयी, धीरज घाटे, आर. पी. सिंग, ललित जैन, हेमंत महाजन आदी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ यांनी नेत्यांना प्रश्न विचारले.
सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तापकीर आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते . अन्य आमदार अनुपस्थित होते . भाजपच्या वतीने संदीप खर्डेकर यांनीही नागरिकांच्या प्रश्नाना उत्तरे दिली .
नागरिकांच्या वतीने ललितकुमार जैन ,एड एस के जैन ,माजी आयकर अधिकारी संतोष दत्त ,प्राचार्य अनुराग कश्यप ,आर पी सिंग यांनी अपेक्षा व्यक्त केल्या . सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले . धीरज घाटे यांनी युवकांच्या अपेक्षा मांडल्या
पुण्याचे वाढते प्रश्न, नागरिकांच्या समस्या, समस्यांबाबत आमदारांची भूमिका तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर व समस्यांवर योग्य तोडगा काढण्याच्या दृष्टिने आमदार आणि नागरिक यांच्यात संवाद साधला जाणे आवश्यक आहे. आमदारांना नागरिकांच्या समस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असे मनोगत उषा वाजपेयी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाआधी आर आर पाटील ,कॉम्रेड पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .‘