प्रधानमंत्री जन धन योजना , सुरक्षा विमा योजना , जीवन ज्योती विमा योजना , आणि अटल पेन्शन योजना या सर्व योजना नागरिकांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केल्या आहेत या योजनेसंदर्भात त्यांनी आज ब्यांका आणि विमा कंपन्या यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर श्री शिरोळे आणि महाराष्ट्र ब्यांकेचे विभागीय व्यवस्थापक आर हरी कुमार यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत लोकजागृती करण्याचे हि आवाहन केले .
ते म्हणाले , १२ रुपयात वर्षभरासाठी २ लाखाचा अपघात विमा , ३३० रुपयात २ लाखाचा मृत्यू पश्चात मिळणारा जीवन विमा , यासह १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींसाठी १ ते ५ हजार रुपयांची पेन्शन योजना अशा चांगल्या योजना २८ सप्टेंबर पासून सुरु झाल्या मात्र अजूनही त्या पुण्यातील १०० टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत . त्यास गती देणे महत्वाचे आहे . आजतागायत १ लाख ९५ हजार नागरिकांची जन धन योजने अंतर्गत कुटुंब खाती उघडण्यात आली आहे यात अजूनही ५ टक्के गरजू लोक सहभागी झालेले नाहीत त्यना सहभागी करून घेणे गरजेचे आहे . प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अवघ्या १२ रुपयात मिळणारी सुविधा असून अद्याप या अंतर्गत केवळ ४ लाख लोक सहभागी झाले आहेत , जीवन ज्योती विमा योजनेत २ लाख २० हजार तर अटल पेन्शन योजनेत केवळ १ हजार ११७ लोक सहभागी झाले आहेत . १०० टक्के लोक यात कसे सहभागी होतील यासाठी पथनाट्ये आणि आदी स्वरूपात जागृती करण्यात येईल आणि स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळे यांची हि मदत घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे . याशिवाय आता जिल्हाधिकारी स्तरावर बैठका घेवून अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क ठेवला जाईल .