पुणे – साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा अशा आनंदी वातावरणात ज्ञानोबा -तुकाराम आणि अन्य संतांच्या पालख्यांचा पुणेकरांनी उत्कट भावनेने पाहुणचार केला.आज सकाळी ज्ञानोबा माउली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ हि केले आज सकाळी दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
शनिवारी माऊलींनी पुण्यामध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी सर्व संत मंडळींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. नाना पेठेत मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी साडे सहा वाजता पुढील मार्गक्रमणासाठी रवाना झाली. तर भवानी पेठेत मुक्कामी असलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाली.
आज सकाळी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीची शिंदे छत्रीजवळ परंपरागत आरती झाली. त्यानंतर हडपसरमध्ये अल्पविश्रांती घेण्यात आली आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमधील अल्पविश्रांतीनंतर सोलापूर रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वरांची पालखी आज दुपारी अडीच वाजता दिवेघाटापर्यंत पोचली आज ती सासवड यथे मुक्कामी असेल .
विठ्ठलनामाच्या गजरातील उत्साही वातावरणात पालखी आगेकूच करत आहे. पालखीच्या पुण्यातील वास्तव्यात पुणेकरांनी प्रचंड उत्साहात पालखीचे स्वागत केले होते. आजही पालखी सोहळ्यात पुणेकरांनी गर्दी केली आहे. विशेषत: तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे. आज अधिकमासातील कमला एकादशी असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालख्या हडपसरपर्यंत एकत्र होत्या . तेथून पुढे वेगळ्या वाटेने दोन्हीही पालख्या पांडुरंगाकडे धावघेतली . संत तुकारामांची पालखी सकाळी पावणे दहा वाजता हडपसरमध्ये पोचली. तर अल्पशा विश्रांतीनंतर सोलापूर रोडने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. तर संत ज्ञानेश्वरांची पालखी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सासवड मार्गे निघाली.
दोन्हीही पालख्यांनी हडपसरमध्ये अल्पविश्रांतीसह अल्पोपहार घेतला. एकादशीच्या निमित्ताने बहुतेक वारकऱ्यांना उपवास असल्याचे ठिकठिकाणी विविध संघटना, संस्थांच्यावतीने उपवासाच्या अल्पोपाहराचे वितरण करण्यात आले. दिवेघाटातील 33 किलोमीटरचा विनाथांबा प्रवास असल्याने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील आजचा दिवस वारकऱ्यांसाठी सत्वपरीक्षा असल्याचे मानले जाते. तर शनिवारी आपला नगर जिल्ह्यातील डोंगलगाव येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे.