पुणे रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील एमसीएच्या कार्यालयाला शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागल्याने कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले. स्थानकाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर बाहेरील बाजूस ही आग लागली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. बाहेरील आग आत पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासात ती आटोक्यात आणली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
पुणे रेल्वे स्थानकाची इमारत ऐतिहासिक असून, ब्रिटिश काळात २७ जुलै १९२५ रोजी बांधून पूर्ण झाली होती. एमसीएच्या कार्यालयात लष्करी अधिकारी, कर्मचार्यांसाठी विश्रामगृहासह कागदपत्रांची पूर्तता करण्याची कामेही येथे केली जातात. इमारतीचे छत पूर्णत: सागवानी लाकडे आणि कौलारू आहे. अचानक लागलेली आग या लाकडांमुळे जास्तच भडकत गेली. एका बाजूने वारा सुटल्यामुळे आग जास्तच भडकत जाऊन सुमारे शंभर ते दीडशे फुटापर्यंत गेली होती. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरील बाजूसपहिल्या मजल्यावरील पोलिसांचे रेकॉर्ड सीसीटीव्ही नियंत्रण कक्षही जळाला
जीवितहानी नाहीया आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी दिली.लागलेली ही आग पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरत मुख्य प्रवेशद्वाराच्या वरपर्यंत आली होती. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले. महापालिकेच्या सात आणि कॅन्टोन्मेंटची एक अशा आठ गाड्या आणि तीन टँकरच्या साहाय्याने सुमारे एक तासात ही आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रवासातील लष्करी अधिकार्यांसाठी विश्रांती कक्ष बनविण्यात आला आहे. या कक्षापासून सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी आगीला सुरुवात झाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविले. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील अर्धा ते एक तास गाड्या त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. या आगीत रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डरूममधील कागदपत्रे जळून खाक झाली. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचा नियंत्रण कक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेची बहुतांशी कागदपत्रे आणि फाइल्स या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात आले. रेल्वेचे मंडल प्रबंधक सुनीत शर्मा यांनीरेल्वे वाहतूक दुसर्या प्लॅटफॉर्मवर वळवली स्थानकाच्या मुख्य इमारतीलाच आग लागल्याने एक क्रमांकाच्या फलाटावर भीतीचे वातावरण होते. त्यामुळे तेथील प्रवाशांना बाजूला करण्यात आले. या फलाटावर येणार्या सगळ्या गाड्या तीन क्रमांकाच्या फलाटावर वळवून वाहतूक सुरळीतपणे चालूच ठेवण्यात आल्याचे वाय. के. सिंग यांनी सांगितले.