पुणे –
पुणे सहकारी बँक गेली कित्येक वर्ष नव्या नव्या सुविधा देत ग्राहकांशी विश्वासाच नात दृढ करू पाहत आहे. स्थानिक लोकांची आपली बँक अशी भावना पुणे सहकारी बँकेच्या सभासद-खातेदार वर्गात आहे . शुक्रवारी २४ जुलै रोजी बँकेच्या बाणेर शाखेचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बँकेच्या वतीने नव्याने देण्यात येणाऱ्या सेफ लॉकर आणि Multi-utility Machine चे उदघाटन करण्यात आले. या वेळी पुणे सहकारी बँकेच्या आत्तापर्यंतची वाटचाल आणि येत्या काळातील ग्राहकांसाठीच्या धोरणांबाबत अधिक माहिती बँकेचे अध्यक्ष बाबा शेख यांनी दिली.
यावेळी पुणेसहकारी बँकेच्या वतीने उद्दोजक पुरस्कार आदर्श उद्दोजक दत्तात्रय तापकीर, प्रकाश बेंद्रे, तुळशीदास वाबळे, अवधूत लोखंडे, लक्ष्मण बालवडकर यांना देण्यात आला. त्याच प्रमाणे युवा उधोजक पुरस्कार अप्पासाहेब भूमकर, गणेश मुरकुटे, विशाल पारखे, संदीप पायगुडे, सुशील देशमुख यांना देण्यात आला. त्याच प्रमाणे महिला उद्दोजक म्हणुन रोहिणी सायकर , आणि वसुंधरा अभिमान गौरव पुरस्कार वसुंधरा अभिमान समुह ग्रुप यांना प्रदान करण्यात आला. या वेळी बँकेचे नवनियुक्त संचालक राहुल पारखे व १० वी १२ वी च्या गुणवत्त विद्ध्यार्थांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, उद्दोजक अशोक मुरकुटे, मारुती भूमकर, पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष-अल्पसंख्यांक विभाग ईकबाल शेख . प्रसिध्द वकील एकनाथ जावीर , बँकेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष प्रेमचंद मेहता, व संचालक मंडळ उपस्थित होते.