पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारताच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. हिराबाग, टिळक रोड येथील पक्ष कार्यालयात स्व. इंदीरा गांधी यांच्या प्रतिमेस खासदार, शहराध्यक्ष अॅड.वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी दिलीप बराटे, विशाल तांबे, अप्पा रेणूसे, आनंद रिठे, शंकर शिंदे, अॅड. घनश्याम खलाटे, दीपक जगताप, दादासाहेब सांगळे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ आदी मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय गाडे यांनी आभार मानले.


