पुणे :
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने अन्नधान्य पुरवठा बंद विरोधी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने धान्य पुरवठा बंद व रॉकेल पुरवठा कमी केल्याने गोर गरीब जनतेवर होणार्या अन्यायाविरोधी आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या वतीने अन्नपुरवठा अधिकारी धनाजी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. हे आंदोलन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले.
महागाईच्या विळख्यात सर्वसामान्य जनता आधीच होरपळत असताना राज्यातील दारिद्रयरेषेवरील (एपीएल) एक कोटी 77 लाख केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा धान्य पुरवठा बंद करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने हे शिधापत्रिकाधारक मध्यमवर्गीय गहू, तांदुळ या धान्यापासून वंचित राहणार आहेत. रॉकेल कपातीबरोबरच पामतेल, साखर, डाळी जीवनावश्यक वस्तू यापूर्वीच गायब झाल्याने राज्यातील सव्वा लाख रेशन दुकानदारांना टाळे लागणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
अजुनही 3 लाख 87 हजार लोक अजुनही या योजनेपासून वंचित आहेत, अशी माहिती यावेळी अधिकार्यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, कमल ढोले-पाटील, सुभाष जगताप, रर्वींद्र माळवदकर यांची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे, महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलचे अध्यक्ष भगवानराव साळुंखे, राजलक्ष्मी भोसले, अशोक राठी, नितीन उर्फ बबलू जाधव, दीपक जगताप, गणेश माथवड, मिलींद वालवडकर, शिल्पा भोसले, शशीकला कुंभार, मनाली भिलारे, विपुल म्हैसुरकर, राकेश कामठे सुरेश बांदल तसेच पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.