पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागातर्फे मुस्लिम आरक्षण स्वाक्षरी मोहीमेस आणि अल्पसंख्यांक पदाधिकारी नियुक्तीस प्रारंभ
पुणे :
मुस्लिम समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण मिळावे यासाठी मा.शरद पवार यांनी मुंबई येथे राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद घेऊन आरक्षणाबाबत संपूर्ण राज्यातून स्वाक्षरी मोहीम राबविण्याकरिता अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सैय्यद जलालुदद्दीन यांना आदेश दिले. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी दिली.
राज्यभरातून होणार्या पुणे शहरातील स्वाक्षरी मोहिमेची सुरूवात दि. 4 सप्टेंबर रोजी पुणे महापालिकेतील पक्ष कार्यालयात झाली. महापौर दत्तात्रय धनवकडे, खासदार शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी माजी महापौर चंचला कोद्रे, निरीक्षक हरीष सणस, नगरसेवक फारूख इनामदार, अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इकराम खान, प्रदेश सरचिटणीस बबलू जाधव, युवती मनाली भिलारे, ज्येष्ठ नागरिक विभाग अध्यक्ष सांगळे, शीख अध्यक्ष भोलासिंग अरोरा, ख्रिश्चन अध्यक्ष नितीन डिसूझा, जैन अध्यक्ष निलेश शहा, संकेत शहा, पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे महिला युवा, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आज दिनांक 7 सप्टेंबरपर्यंत जवळपास सोळा लाख सह्याचा आकडा पार झाला आहे.
ही स्वाक्षरी मोहीम पुणे शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे खासदार अॅड. वंदना चव्हाण व अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इक्बाल शेख यांनी सांगितले.
तसेच या कार्यक्रमात पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग, महिला युवा पदाधिकारी व निरीक्षक यांच्या नियुक्ती पत्राचे वाटप महापौर दत्तात्रय धनकवडे, शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी महापौर चंचला कोद्रे, निरीक्षक हरीष सणस, नगरसेवक फारूख इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.