पुणे:
‘महानगरपालिकेच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे शहर पर्यटन केंद्र व्हावे याबाबतच्या उपक्रमांना गती मिळावी’, असे मत खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण व्यक्त केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. ही बैठक दिनांक 13 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयात झाली.
‘ब्रँडिग पुणे’ च्या धर्तीवर विश्रामबाग वाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, बंडगार्डन ब्रिज येथे ‘आर्ट प्लाझा’, नानावाडा येथे ‘स्वातंत्र्य सैनिकांचे संग्राहलय’, पु.ल.देशपांडे उद्यान येथे ‘हेरिटेज व्हिलेज्’, पुण्यातील विविध उद्यानांमध्ये विविध राज्यांमधील कलाकूसरीच्या वस्तुंचे कायमस्वरूपी प्रदर्शन, हेरिटेज पर्यटन, ‘सायन्स पार्क’ ची उभारणी ‘दिल्ली हट’ च्या धर्तीवर ‘पुणे हट’ ‘बाजार प्रदर्शन’, पुणे दर्शन बस आकर्षक करणे, पर्यटकांसाठी माहिती केंद्र उभारणे अशा अनेक महत्वाच्या मुद्यांविषयी चर्चा या बैठकीत करण्यात आली.
या व अशा योजना पुढे नेण्याच्या संदर्भात कलाक्षेत्रातील तज्ज्ञ, वास्तूविशारद (अर्किटेक्ट) याबैठकीला उपस्थित होते. यावेळी ‘इन्टॅक्ट’च्या आरती किर्लोस्कर, पारूल मेहता, आदिती भेंडे, राजू सुतार, लिसा पिंगळे, भानूबाई नानावटी महाविद्यालयाचे प्राचार्य अनूराग कश्यप, भारती विद्यापीठ अर्किटेक्ट महाविद्यालयाचे किरण शिंदे यावेळी उपस्थित होते.
याबैठकीचे संयोजन रवी चौधरी, चंदा पाटील यांनी केले होते.
‘ब्रँडिंग पुणे’ साठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा घडविली पाहिजे. ब्रँडिंगच्या वास्तू केल्या पाहिजेत आणि हेरिटेज पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ‘सायन्स पार्क’ च्या उभारणी साठी गती देण्याबरोबर फुलपाखरू उद्यान, पुणे शहराची प्रवेशद्वारे, पेशवे पार्कचे उर्जा उद्यान पुन्हा सुरू करणे अशा मुद्यांवर अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्क प्रतिसाद दिल्याचेे खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
पर्यटन प्रकल्पांना पाठपुरावा करण्यासाठी विविध क्षेत्रातील पुणेकर नागरिकांची समिती स्थापन करण्याची सूचना अॅड.वंदना च्वहाण यांनी केली.
नदी पात्रात सातत्याने राडारोडा टाकला जात असल्याकडे खा.चव्हाण यांनी अतिरिक्त आयुक्तांचे लक्ष वेधले. कचरा व्यवस्थापनाचा आराखडा, ‘अॅमिनीटी स्पेस’चे मॅपिंग यावरही चर्चा झाली.