पुणे स्वच्छ भारत अभियानातर्गत कायमस्वरूपी उपक्रम राबविण्याच्या विधायक उद्देशाने, लायन सर्विस फोरम व नवचैतन्य हास्ययोग परिवार एकत्रितपणे शहरातील १२० उद्यानांमध्ये स्वच्छता अभियान उपक्रम राबविणार आहेत. वर्तक उद्यानाची साफसफाई करून या अनोख्या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो तशीच बागही स्वच्छ ठेवावी, असा संदेश देत नागरिकांना स्वच्छते बाबत स्वयंप्रेरित करण्याचे काम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी केले. यावेळी बागेत आलेल्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्वही त्यांनी पटवून दिले.
लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन हसमुख मेहता, माजी प्रांतपाल लायन बी.एल.जोशी, लायन हरीश पाटणकर, नवचैतन्य हास्ययोग परिवारचे अध्यक्ष विठ्ठल काटे,जयेश कासट हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी नवचैतन्य हास्ययोग परिवारा तर्फे जयेश कासट यांना नवचैतन्य हास्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.