पुणे-
श्रावणमासानिमित पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पुणे कॅम्प विभागाच्यावतीने सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न झाली . पुणे कॅम्प मधील महात्मा गांधी रस्त्यावरील स्टर्लिंग सेंटरमध्ये हि सत्यनारायण महापूजा झाली . यावेळी पांडुरंग बंदिष्ट गुरुजी यांनी महापुजा केली . यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पुणे कॅम्प विभागाचे अध्यक्ष प्रमोद परुळेकर , उपाध्यक्ष अरविंद निंबाळकर , वैजनाथ कानडे , राजेद्र कवडे , गजानन कवडे , अतुल भुजबळ , कुमार जांभुळकर , शशिकांत तोटे , राजू सावंत , हर्षवर्धन संकपाळ , राजू भागवत , अर्पित परुळेकर , दत्तात्रय परुळेकर , बापू शिंदे आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बँकेचे संचालक पोपट गायकवाड , पत्रकार महेश जांभुळकर , शंकर जोग उपस्थित होते . या वेळी विविध वर्तमानपत्राचे वितरण प्रतिनिधी , कर्मचारी , ग्राहकवर्ग उपस्थित होते . यावेळी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले . सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला .