पुण्यातील मानाचा मानला जाणारा ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे ’ स. प. महाविद्याल्याचे प्राचार्य दिलीप सेठ यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. फटाक्यांच्या आतिशबाजी व ढोल पथकाच्या गजरात देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . या प्रसंगी लोकमान्य फेस्टीव्हल चे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, आनंद आगरवाल, नरेश मित्तल, बिपीन मोदी, महेश महाले, आदित्य सातपुते, शुभांगी सातपुते, रेणुका शिंदे, संगीता मित्तल, असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे गौरवशाली १८ वे वर्ष असून या वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार असून दांडिया व रावण दहन हे दोन मोठ्या कार्यक्रमांचे आकर्षण असणार आहे. असे लोकमान्य फेस्टीव्हलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.