पुण्यातील मानाचा मानला जाणारा ‘पुणे लोकमान्य फेस्टिवल’ तर्फे दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन येत्या 20 ऑक्टोबर रोजी सायं. ७ वा. महालक्ष्मी लाँन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून पुणे व परिसरातील तरुणायीने यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ‘पुणे लोकमान्य फेस्टीवल’चे संस्थापक – अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी केले आहे.
‘पुणे लोकमान्य फेस्टिवलचे हे गौरवशाली १८ वे वर्ष आहे. दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून यात बेस्ट ग्रुप, बेस्ट कपल, बेस्ट किड, बेस्ट ड्रेपरी, बेस्ट मेल, बेस्ट फिमेल अशा विविध स्पर्धांचे योजन करण्यात आले आहे. मोफत प्रवेशिकेसाठी कृपया ८८८८७२६८८६, ९६३०३८०९०२, ९९७०७५६६०६, ९९२१५६४५९१ या क्रमांकावर संपर्क करावा.