पुणे –
पुणे महानगरपालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे महापौर दत्तात्रय
धनकवडे यांच्या हस्ते अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक विनायक हनमघर आणि
रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे मनपाच्या वतीने तीन चाकी रिक्षांकरिता प्रदूषण रोखणेसाठी
आणि सी.एन.जी.इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सी.एन.जी. किट बसविलेल्या परमिट धारकांना प्रत्येकी
१२०००/- रू.चे अनुदान देण्यात येते. सी.एन.जी किटकरिता प्रत्येक रिक्षा मालकाच्या नावे रक्कम रुपये १२,००० /-
सहाय्यक अनुदान देणेबाबत मुख्य सभेने ठराव क्र.३६७ दि.२३/०८/२०११ अन्वये मान्यता दिली आहे.
ज्या रिक्षांना सी.एन जी किट बसविलेले आहे व त्याची नोंद आर.टी.ओ.मध्ये केलेली आहे, अशा रिक्षा या
अनुदानास पात्र आहेत. सी.एन.जी.अनुदानाच्या फॉर्मसोबत १)रिक्षांचे आर.सी. चे पुस्तक, २)सी.एन.जी. किट
बसविल्याबाबतची पावती, ३)लायसन्स,४)परमीट,५)फिटनेस सर्टिफिकेट, ६)पी.यू.सी ७) आर.टी.ओ.ओळखपत्र या
कागदपत्रांची तपासणी केली जाते व सदरची यादी आर.टी.ओ. मार्फत तपासणी करून घेण्यात येते.
मागील चार वर्षापासून ही योजना राबविण्यात येत आहे. पुणे मनपातर्फे आजतागायत खालीलप्रमाणे
अनुदान देण्यात आलेले आहे.
आर्थिक वर्ष रिक्षांची संख्या खर्च रु. अनुदान तरतूद
आर्थिक वर्ष -रिक्षांची संख्या- खर्च रु. -अनुदान तरतूद
२०११ १२ १६६० १,९९,२०,०००/- रु. २ कोटी
२०१२ -१३ ८७३९ १० ,४८,६८०००/- रु. १२ कोटी
२०१३ – १४ १६५० १,९८,००,०००/- रु. २ कोटी
२०१४ १५ २१६१ २,५९,३२,०००/- रु.२.६० कोटी
२०१५ – १६ ११४० १,३६,८०,०००/- १.४४ कोटी
एकूण-१५३५० रिक्षा – एकूण खर्च अनुदान १८,४२,०००००/- अनुदान तरतूद -२0कोटी 4 bmI
पुण्यातील सी.एन.जी. किट बसविलेल्या तीन चाक़ी ऑटो रिक्षांना सहाय्य अनुदान देणेबाबत पुणे
म.न.पा.च्या सन २०१५-१६ च्या बजेटमध्ये र. रु. एक कोटी चव्येचाळीस लाख इतकी तरतूद उपलब्ध केलेली आहे.
या वर्षीच्या तरतुदीमध्ये एकूण ११४० ऑटो रिक्षांना या अनुदानाचा लाभ होणार आहे.
मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षा सी,एन.जी.वापर करीत असल्याने शहरात होणाऱ्या हवेतील प्रदुषणाचे प्रमाण
कमी होण्यास मदत झाली आहे.