पुणे- पुणे फेस्टिव्हल च्या २७व्या वर्षी आज सकाळी फेस्टिव्हल चे अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पुणे फेस्तीव्हालच्या गणराजाची विधिवत प्रतिस्थापना करण्यात आली . यावेळी डॉ. सतीश देसाई , अभिनेत्री दिपाली सय्यद तसेच पी ए इनामदार , आबेदा इनामदार , सुनंदा गदाळे, काका धर्मावत , रवींद्र दुर्वे , बाळासाहेब अम राळे ,कृष्णकांत कुदळे, सुहास रानवडे प्रसन्न जगताप आदी मान्यवर उपस्थित होते
27 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण रंगीत तालीम आज (दि. 17) दुपारी तीनपासून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरू होत आहे. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्कांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सतिश देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लावणी आणि भांगडाचे फ्युजन, श्री गणेश वंदना, जय मल्हार आणि गोंधळ असा धार्मिक कार्यक्रम, मल्लखांब आणि योगाची प्रत्याक्षिके तसेच लोकमान्य टिळक आणि त्यांच्य सहकार्यांनी केलेली गणेशपूजा यांचा रंगीत तालमीत समावेश असणार आहे. याचे सूत्रसंचालन मराठीमधून सुधीर गाडगीळ करणार आहेत.
तसेच या फेस्टिव्हलमध्ये सलग 10 दिवस सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम होणार आहेत. पुणे फेस्टिव्हलच्या पूर्व तयारीवर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने कर्टन रेझर टीव्ही रिपोर्ट हा कार्यक्रम तयार केला असून याचे प्रक्षेपण आज (गुरुवार) रात्री साडेदहा वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. यामध्ये कार्यक्रमाची पूर्वतयारी, रंगीत तालीम, निमंत्रणे वाटप याबरोबर सर्व कार्यक्रमांची माहितीचा समावेश आहे. तसेच यामध्ये सुरेश कलमाडी आणि कृष्णकांत कुदळे यांच्या निवडक मुलाखतींचाही समावेश आहे.