पुणे- बॉलीवूड मधील स्टार कलाकारांची मांदियाळीत संगीत, नृत्य, नाट्य, कला, वादन, गायन, क्रीडा व संस्कृती यांचा
मनोहारी संगम असलेल्या २७ व्या पुणे फेस्टिवलचे शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शानदार
उद्घाटन झाले. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात पुणे फेस्टिवलचे मोठे योगदान आहे असे गौरोद्गार गिरीश बापट यांनी यावेळी
काढले.
२७ व्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गिरीशबापट बोलत होते. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उद्योगपती राहुल बजाज, पुणे फेस्टिवलचेमुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, उपमहापौर आबा बागुल, , महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपराग जैन नानुटीया, म्हैसूरचे महाराजा यदुवीर वडीयार, पुणे फेस्टिवलच्या पेट्रन हेमामालिनी व अभिनेत्री खासदारहेमा मालिनी, जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, अभिनेते जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, शेखर सुमन, कुणाल कपूर, अभिनेत्री बिंदू,अभिनेत्री पूनम धिल्लन, संगीतकार अजय-अतुल, डॉ उमा गणेश नटराजन, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या अबिदाइनामदार,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष सुभाषसणस, डॉ. सतीश देसाई आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी महारष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ मदतनिधीला पुणे फेस्टिवलतर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश सुरेश कलमाडी यांनी गिरीश बापट यांच्याकडे सुपूर्द केला.
जेष्ठ अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना यंदाच्या पुणे फेस्टिवल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यातआले. शशी कपूर यांच्या वतीने त्यांचे पुत्र अभिनेते कुणाल कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच संगीतकार अजय-अतुल, डॉ. उमा गणेश नटराजन, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री बिंदू, अभिनेत्री पूनम धिल्लन डॉ. उमा गणेश नटराजन’डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष अबिदा इनामदार,यांना पुणे फेस्टिवल अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. तरअभिनेत्री हेमा मालिनी यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याला तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने प्रारंभ झाला. मंचावरील श्री गणेशाचीआरती करण्यात आली. नृत्यगुरु डॉ. सुचित्रा भिडे चाफेकर यांची संकल्पना, नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांचे नृत्यदिग्दर्शन आणि कालावर्धिनी संकुलाच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली.त्यानंतर २७ वर्षांपैकी २५ वर्षे गणेश वंदना वविविध बॅले सदर करणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नाट्यविहार कालाकेंद्राच्या कलाकारांच्या समवेत नेत्रदीपकश्रीकृष्ण वंदना सादर केली. त्यानंतर कोरिओग्राफर निकिता मोघे दिग्दर्शित व नेहा पेंडसे, सौरभ गोखले, दिपाली सय्यद,शर्वरी जमेनीस, रेशम टिपणीस, पुष्कर जोग या चित्रपट, नाट्य कलावंत यांच्यासह इंद्रधनुच्या ४० कलाकारांचा सहभागअसलेल्या महाराष्ट्र रांगडा व पंजाबी भांगडा या लावणी व भांगडा यांचा फ्युजन असलेल्या कार्यक्रमाने प्रेक्षकांनी रंगमंचडोक्यावर घेतले. त्यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या १५ विद्यार्थ्यांनी योग आणि २५ विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची नेत्रदीपकप्रात्यक्षिके सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कोरिओग्राफर तेजश्री आडीगे यांनी दिग्दर्शित केलेलाजयमल्हार आणि गोंधळ आदिशक्तीचा हा खंडोबा व आंबामातेचे जागरण करणारा कार्यक्रम सादर केला. त्यामध्येअभिनेता आदिनाथ, श्रुतिका मराठे , प्राजक्ता माळी आणि पुण्यकर उपाध्याय व इतर सहकारी कलाकारांनी सहभागघेतला. लोकमान्य टिळकांचे पात्र सादर करणारे श्री कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्री गणेशाचे दर्शन घेतले.
गिरीश बापट म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव स्वराज्यासाठी सुरु केला होता. आतासुराज्य होण्यासाठी पुणे फेस्टिवल सारख्या फेस्टिवलची आवश्यकता आहे. पुणे फेस्टिवल हा कार्यक्रम राजकीय नाही तरसांस्कृतिक आहे असे सांगून बापट म्हाणाले, राजकारणापलीकडे जावून अशाप्रकारच्या सांस्कृतिक कार्याकारामांना मदतकरणे क्रमप्राप्त आहे. अशा प्रकारच्या चांगल्या उपक्रमांना आपले नेहेमी सहकार्य राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.पुणे फेस्टिवल जीवनगौरव पुरस्काराविषयी मनोगत व्यक्त करताना प्रेम चोप्रा म्हणाली, फेस्टिवलमध्ये सादर झालेल्याविविध कार्यक्रमांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे टॅलेंट बघायला मिळाले. पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंद झाला आहे.आपले नाव आपणच सांगा असे प्रेम चोप्रा यांना सांगण्यात आले. त्यांच्या संवाद फेकीच्या विशिष्ट शैलीत त्यांनी ‘प्रेम नामहै मेरा.. प्रेम चोप्रा’ असे वाक्य उच्चारताच प्रेक्षकांनी शिट्या वाजवून रंगमंच दणाणून सोडला.
जॅकी श्रॉफ यांनीही त्यांच्या नेहेमीच्या शैलीत प्रेक्षकांशी संवाद साधला. पुण्यात आल्यानंतर अजुनही जुन्या मित्रांकडेजातो. वडापाव, मेतकुट भात खातो असे सांगत आपल्याला जमिनीवरच राहायला आवडते असे सांगितले.संगीतकार अजय म्हणाले, पुणे फेस्टिवल सुरु झाला तेंव्हा आम्ही पुण्याच्या बाहेर होतो. पुणे फेस्तीवलबद्दल खूप ऐकलेहोते. त्यामध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा होती. कधीही संगीत शिकलो नाही. सिनेमे बघून बघून त्यातून शिकत गेलो.ज्या लोकांकडून प्रोत्साहन मिळाले त्यांच्यामध्ये बसण्याचा मान मिळेल असे कधीही वाटले नव्हते. अतुल यांनी खासआग्रहास्तव ‘देवा तुझ्या दारी आलो’…. हे गीत सादर केले.हेमा मालिनी म्हणाल्या, पुण्याच्या नागरिकांनी साथ दिली त्यामुळे पुणे फेस्टिवल २७ वर्षे सुरु आहे. फेस्टिवलमध्येमोठमोठ्या बॉलीवूडच्या कलाकारांना बोलावून त्यांना सन्मानित केले. अनेक कलाकारांनी या फेस्टिवल मध्ये सांस्कृतिककार्यक्रम केले. हा फेस्टिवल आम्ही असू वा नसो तो सुरु राहिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सुरेश कलमाडी आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाले, एखादा फेस्टिवल सुरु करणे खूप सोपे असते मात्र तोसातत्याने सुरु ठेवणे ही अवघड बाब आहे. पुणे फेस्टिवलची ओळख ‘मदर ऑफ आॅल फेस्टिवल अशी झाली आहे. पुणे हाराजकीय नाही तर सांस्कृतिक मंच आहे असे त्यांनी नमूद केले. पुण्यामध्ये मेट्रो लवकरच सुरु होईल त्याचे श्रेय गिरीशबापट यांना जाते मात्र त्यासाठी आम्ही खूप अगोदर प्रयत्न केले. त्याला बापटांनी धक्का दिला असे ते म्हणाले.अभिनेते अनिल कपूर, शेखर सुमन, हर्षवर्धन पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.