पुणे : थकबाकीमुक्तीसाठी असलेल्या महावितरणच्या कृषी संजीवनी योजनेत पुणे परिमंडलातील 30,683
कृषीपंपधारकांनी सहभाग नोंदविला असून मूळ थकबाकी व चालू देयकांपोटी आतापर्यंत 18 कोटी 50 लाख
दरम्यान, कायमस्वरुपी वीजजोडणी खंडित झालेल्या व चालू (Live) जोडणीच्या थकबाकीदार
कृषीपंपधारकांसाठी कृषी संजीवनी योजनेला येत्या 31 मार्च 2015पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
पुणे परिमंडलात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले व चालू वीजजोडणीचे 78100 थकबाकीदार
कृषीपंपधारक आहेत. या सर्व थकबाकीदारांकडे एकूण 105 कोटी 51 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे.
तथापि, कृषी संजीवनी योजनेत 50 टक्के मूळ थकबाकीचे 36 कोटी 84 लाख रुपये तसेच विलंब आकार शुल्काची
1 कोटी 47 लाख व व्याजाची 30 कोटी 35 लाखांची थकबाकी 100 टक्के माफ होणार आहे. त्यामुळे पुणे
परिमंडलातील थकबाकीदारांना 105 कोटी 51 लाखांपैकी तब्बल 68 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी या
योजनेत माफ होणार आहे. उर्वरित 36 कोटी 85 लाख रुपयांच्या 50 टक्के मूळ थकबाकीचा व नियमित देयकांचा
भरणा करून येत्या मार्च 2015 पर्यंत कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्तीची संधी आहे.
पुणे परिमंडलात जानेवारी अखेरपर्यंत 30683 कृषीपंपधारकांनी मूळ थकबाकी व एप्रिल 2014 नंतरच्या
नियमित देयकांचा एकूण 18 कोटी 50 लाख रुपयांचा भरणा करून योजनेच्या माध्यमातून थकबाकीमुक्त झाले
कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी थकबाकीदार कृषीपंपधारकांनी 31 मार्च 2014 पर्यंतच्या
मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम येत्या 31 मार्च 2015 पर्यंत भरावी तसेच 1 एप्रिल 2014 नंतरच्या सर्व चालू
देयकांचा भरणा करावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे
आवाहन महावितरणने केले आहे.