उपमहापौर आबा बागुल यांच्या ‘ पुणे नवरात्रो महोत्सवाचे आज शानदार उद्घाटन झाले . या वेळी महापौर दत्ता धनकवडे , माजी खासदार सुरेश कलमाडी , सचिन पिळगावकर , दिपाली सय्यद तसेच नंदकुमार बानगुडे घनश्याम सावंत आदी उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले
मातृभक्ती ही माझ्या स्वभावातच असून, गेले ५८ वर्षे मी आईची पूजा करत आहे. आई हेच खरे ‘देवीचे’ स्वरूप असून, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच मी मजल मारू शकलो, अशी भावना सिनेसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी यावेळी व्यक्त केली.
. नेहरू स्टेडियम येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात सिनेअभिनेते अनंत जोग, दै.पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन बोरा, प्रकाश मुलाबागल,दीपाली सय्यद, मोतीलाल निनारीया यांना लक्ष्मीमाता कला संस्कृ ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
पिळगांवकर म्हणाले की, माझी आई ही माझ्यासाठी आदर्श मैत्रीण, मार्गदर्शिका तसेच सर्वकाही आहे. पुण्याचे उपमहापौर आबा बागूल यांनी तब्बल ५0 हजार जणांना काशी यात्रेला नेवून मातृप्रेमाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. सध्याच्या काळात अशा प्रकारचे राजकीय पुढारी अभावानेच आढळतात. पुण्याचे प्रेक्षक हे रसिक प्रेक्षक असून, त्यांच्याकडून दिलेली दाद ही मनाला चांगलीच सुखावून जाते. यामुळेच पुण्यात बागूल यांच्या कार्याला मिळालेला उदंड प्रतिसाद ही त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने करण्यात आली. रत्नाकर शेळके यांच्या डान्स अँकॅडमीने सादर केलेल्या ‘भारतीय पारंपरिक नृत्य’ लावणी नृत्य, पाश्चिमात्य नृत्यांचा सुंदर मेळ घालत सादर केलेल्या ‘फ्युजनला’ प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. नवरात्रीच्या संध्येला ‘लेझर शो’ ने व्यासपीठावर चांगलीच रंगत आणली होती. तसेच ‘देवीच्या गोंधळाने’ प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली.